पिंपरीतील चाटे कोचिंग क्लासेस विरोधात गुन्हा दाखल

253

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी परिसारातील विद्यूत पुलांवर अनधिकृतपणे जाहिरात फलक लावल्या प्रकरणी चाटे कोचिंग क्लासेस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी विजय पांडुरंग बाटे (वय ५३, रा. धनकवाडी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील गणेश हॉटेल येथे चाटे कोचिंग क्लासेस आहेत. चाटे यांच्या क्लासमध्ये शिकणारा अमे हा सीईटी परिक्षेत राज्यात दुसरा आला आहे. दुसरा क्रमांक मिळविल्याची जाहिरात फलक रस्त्यावरील विद्यूत पुलवर कोणत्याही परवाणगी शिवाय लावण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.