पिंपरीतील एच. ए. ग्राऊंडवर अज्ञात तरूणाचा खून; डोक्यात दगड घालून जाळला मृतदेह

330

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – एका अंदाजे १८ ते २० वय वर्षाच्या तरुणाच्या डोक्यात दगड आणि सिमेंटचा गट्टू घालून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळला आणि पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना आज (रविवार) सकाळी ८ च्या सुमारास पिंपरी नेहरूनगर येथील एच. ए. ग्राऊंडमधून समोर आली.

घटनेची माहिती ग्राऊंडवर क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या मुलांनी पोलिसांना दिली.

यानंतर पिंपरी पोलीस ठाण्यातले पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता तरुणाच्या डोक्यात सिमेंटा गट्टू आणि दगड घालून त्यानंतर त्याचा मृतदेह जाळून टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक कल्याण पवार, गुन्हेशाखेचे पोलिस निरिक्षक रंगनाथ उंडे, गुन्हेशाखेचे पोलिस उपनिरिक्षक अंसार शेख, पोलिस उपनिरिक्षक हरिदास बोचरे  यांनी पाहणी केली आहे. मृतदेह पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.