पिंपरीतील उद्यमनगरमध्ये प्लास्टिकची बॅग मागीतल्याने दुकानदाराकडून ग्राहकाला बांबुने मारहाण

36

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरीतील उद्यमनगर भागात एका बेकरी दुकानदराला ग्राहकाने प्लास्टिकची कॅरी बॅग मागितल्याने दुकानातील दुकानदारासह तीघाजणांनी ग्राहकाला बांबुने जबर मारहाण करुन जखमी केले आहे.

मॅनवेल झेवियर दास (वय-३४ रा.मासूळ वसाहत) असे मारहाण झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने पिंपरी पोलिस ठाण्यात बेकारी दुकानदार नसरुद्दीन अन्सारी (वय-२७ रा.नेहरू नगर) याच्यासह तिघां विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी त्यानुसार या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मॅनवेल झेवियर दास हे शुक्रवारी (दि.२९) सकाळी नऊच्या सुमारास उद्यम नगर येथील ओव्हन फ्रेश बेकरी येथे खारी आणि टोस्ट आणण्यासाठी गेले होते. खारी आणि टोस्ट खरेदी केल्यावर दास यांनी दुकानदाराकडे प्लास्टिक कॅरिबॅगची मागणी केली. मात्र यावर दोघांमध्ये वाद झाला. यामुळे दुकानदार नसरुद्दीनसह तीन कामगारांनी ग्राहक मॅनवेल यांना बांबूने डोक्यात  मारहाण करुन जखमी केली. जखमी मॅनवेल यांनी पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे,त्यानुसार दुकानदार नसरुद्दीनसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.