पिंपरीतील आदित्य खोत खून प्रकरणी दोघांना अटक

255

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरीतील आदित्य खोत खून प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मोनू उर्फ तरुण टाक (वय २०, रा. पिंपरी) आणि जतीन मुकेश मेवाती (वय १८, बोपखेल) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. तर कटात सामील असलेले आरोपींचे इतर सहकारी मात्र फरार झाले आहेत.

लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला आर्थीक मदत करतो म्हणून पिंपरीत मित्राच्या वाढदिवसासाठी आलेल्या आदित्य खोतचा नांदेगाव येथील डोंगरावर पार्टीच्या बहाण्याने नेऊन मंगळवारी (दि.१७) धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने मोनू आणि जतीन या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २७ जुलै पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र कटात सामील इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.