पिंपरीतील आदित्य खोत खून प्रकरणी आणखी एकाला अटक

307

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – आदित्य खोत खून प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. विजय हुकमे टाक (वय २७, रा. सुभाषनगर, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला आर्थीक मदत करतो म्हणून पिंपरीत मित्राच्या वाढदिवसासाठी आलेल्या आदित्य खोतचा नांदेगाव येथील डोंगरावर पार्टीच्या बहाण्याने नेऊन मंगळवारी (दि.१७ जुलै) धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला होता. याप्रकरणात विजय टाक हा बऱ्याच दिवसांपासून फरार होता. विजय टाक हा काळभोरनगर येथे येणार असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना त्यांच्या खबऱ्या मार्फत मिळाली. यावर पिंपरी पोलिसांनी सापळा रचून विजय याला काळभोरनगर येथून अटक केली. पोलिसांनी पुढील तपासासाठी विजय याला पौंड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.