पिंपरीतील आंबेडकर चौकात दोन अल्पवयीन मुलांकडून पिस्तुल आणि काडतुसे जप्त

178

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरीतील आंबेडकर चौकात दोन अल्पवयीन मुलांकडून एका पिस्तुलासह तीन जिवंत काडतुस जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी आज (मंगळवारी) दुपारी बाराच्या सुमारास केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ एका टपरीवर दोन अल्पवयीन मुले थांबली असून त्यांच्याजवळ एक पिस्तुल असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना त्यांच्या खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आंबेडकर चौकात सापळा रचला. चौकातील एका टपरीजवळून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारना केली असता, एका मुलाच्या कमरेला पिस्तुल आणि दुसऱ्याजवळ तीन जिवंत काडतुसे आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांविरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये दोघेही फरार होते.