‘पिंजऱ्यातला नको हो जंगलातला वाघ हवा’

47

पुणे, दि. १० (पीसीबी) – शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर देत भाजपवर निशाणा साधला होता. राऊतांनी केलेल्या टीकेवरून पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही, पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर राऊतांनी पाटलांना प्रत्यत्तर दिलं होतं.

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं. यावरून पुन्हा एकदा पाटलांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झाला असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

WhatsAppShare