पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिंचवडगावातील भाजी मंडई सुरू करण्यास परवानगी

64

पिंपरी, दि. 1 (पीसीबी): आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने चिंचवडगावातील भाजी मंडई सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मंगळवारपासून (दि. 2) ही मंडई सुरू करण्यात येणार आहे.

“करोना’च्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने चिंचवडगाव येथील भाजी मंडई चितराव गणपती मंदिर येथील मोकळ्या मैदानात स्थलांतरित केली होती. मात्र, ही जागा गैरसोयीची व लांब असल्याने ग्राहकांनी या मंडईकडे पाठ फिरवली होती. पावसाळ्यात या जागेत चिखल होणार असल्याने तसेच पावसामुळे भाज्या खराब होण्याची भीती येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. ही मंडई पूर्वीप्रमाणे पुन्हा चिंचवडगावात सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे यांनी महापालिकेकडे केली.

WhatsAppShare