पावसाळी अधिवेशनात अजित पवारांचा मुलगा पार्थची हजेरी

131

नागपूर, दि. १९ (पीसीबी) – राज्य विधीमंडळाचे कामकाज जाणून घेण्यासाठी नेत्यांची मुले नागपुरात दाखल झाली आहेत. पावसाळी अधिवेशन पहिल्यांदाच नागपूरमध्ये घेण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटनासह अधिवेशनाचे कामकाज जवळून पाहण्यासाठी नेत्यांच्या मुलांनी हजेरी लावल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे बुधवारी नागपुरात दाखल झाले होते. त्यांनी दिवसभर विधीमंडळाचे कामकाज प्रेक्षक गॅलरीत बसून पाहिले होते. त्यानंतर आज (गुरूवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी विधानभवनात हजेरी लावली.

आदित्य ठाकरे हे अधिवेशन असताना मुंबईत हजेरी लावतात. यावेळी त्यांनी नागपूरमध्येही उपस्थिती लावली.  त्यानंतर आज पार्थ पवारदेखील कामकाज पाहण्यासाठी नागपूरला आले.  पार्थ पवार यांनी संविधान मोर्चामध्ये मुंबईत सहभाग घेतला होता.