पार्टीसाठी गोव्याला जाणाऱ्या मित्रांवर काळाची झडप; एकाचा दुर्दैवी मृत्यू तर दोघे जखमी

80

चाकण, दि.31 (पीसीबी) : दारूच्या नशेत दुचाकीवरून ट्रिपलसीट जात असताना दुचाकीस्वाराने रस्त्यावरील डिव्हायडरला जोरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर इतर दोघे सहप्रवासी जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. 29) रात्री अकरा वाजता कुरुळी गावात पुणे-नाशिक रोडवर घडली.

देवाशिष पांडा असे मृत्यू झालेल्या सहप्रवासी तरुणाचे नाव आहे. अनिल देवेंदर मिश्रा (वय 27, रा. कुरुळी. मूळ रा. उडीसा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीचालक पंकज बिहारी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज, फिर्यादी अनिल आणि मयत देवाशिष हे मित्र आहेत. त्यांना गोवा येथे फिरायला जायचे होते. त्यांचे नियोजन सुरु होते. दरम्यान ते दारू पिऊन पुणे-नाशिक रोडवरून ट्रिपलसीट जात होते. आरोपी पंकज हा दुचाकी चालवत होता.

ते कुरुळी गावात आले असता पंकज याने भरधाव वेगात दुचाकी चालवून रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला जोरात धडक दिली. त्यामध्ये सहप्रवासी देवाशिष याचा मृत्यू झाला. तर अनिल आणि पंकज हे दोघेजण जखमी झाले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare