पादचारी व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून लुटले

62

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटले. ही घटना सोमवारी (दि. ११) रात्री दीडच्या सुमारास फुगेवाडी उड्डाणपुलावर दापोडी येथे घडली.

सतीश श्रावण कांबिये (वय ५९, रा. संजयनगर, फुगेवाडी) यांनी याप्रकरणी (दि. १२) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फुगेवाडी उड्डाणपुलावरून पायी चालत जात होते. त्यावेळी एका दुचाकीवरून तीन अनोळखी चोरटे आले. त्यांनी फिर्यादीला घेरून शिवीगाळ केली. तुझ्या खिशामध्ये जे काय आहे ते काढून दे, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीला कोयत्याचा धाक दाखवून धमकावले. फिर्यादीच्या खिशामधील पाकिटातील १५ हजार २०० रुपये पाकिटासह जबरस्तीने काढून घेऊन ते त्यांच्या दुचाकीवरून पळून गेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare