पादचारी तरुणाला दोघांनी लुटले

65

मोशी, दि.२० (पीसीबी) – पादचारी तरुणाला दोघांनी शिवीगाळ करत लुटले. तरुणाच्या पाकिटातून रोख रक्कम चोरट्यांनी जबरदस्तीने काढून घेतली. ही घटना रविवारी (दि. 19) रात्री बो-हाडेवाडी मोशी येथे घडली.करणसिंग अमरसिंग यादव (वय 22, रा. बो-हाडेवाडी, मोशी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साळवे (रा. संजय गांधीनगर, मोशी), मिलन थापा (रा. जाधववाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यादव रविवारी रात्री बो-हाडेवाडी मोशी येथे पायी चालत जात होते. रात्री आठ वाजताच्या सुमारास यादव त्यांच्या घरासमोर फिरत असताना आरोपींनी करून जबरदस्तीने खिशातून पाकीट काढले. त्यातील तीन हजार रोख रक्कम आरोपींनी जबरदस्तीने काढून चोरून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत. 

WhatsAppShare