पाणी का सोडले नाही असे विचारल्यावरून दोघांना मारहाण

46

चऱ्होली, दि. १० (पीसीबी) – पाणी का सोडले नाही, असे विचारल्यावरून चार जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 9) रात्री घोलपवस्ती, च-होली खुर्द येथे घडली.

तानाजी किसन पिंगळे (वय 42, रा. घोलपवस्ती, च-होली खुर्द), अंकुश पांढरे अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. तानाजी यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्ता घोलप (रा. घोलपवस्ती) आणि इतर तीन अनोळखी ईसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सात वाजताच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घराच्या गेट समोर मामाचा मुलगा अंकुश पांढरे यांच्या सोबत बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी दत्ता घोलप आणि त्याचे तीन अनोळखी साथीदार तिथे आले. फिर्यादी यांनी आरोपीला पाणी का सोडले नाही, असे विचारले होते. त्याचा राग मनात धरून आरोपी दत्ता घोलप याने लोखंडी रॉडने व दगडाने फिर्यादी यांच्या डोक्‍यात मारहाण केली. तसेच तीन अनोळखी साथीदारांनी फिर्यादी आणि अंकुश पांढरे यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare