पाणीपुरी खाताना धक्का लागल्याने मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल

66

वाकड, दि. १८ (पीसीबी) – पाणीपुरी खाताना धक्का लागल्याने मारहाण झाली. याप्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री सव्वा आठ वाजता छत्रपती चौक, कस्पटे वस्ती, वाकड येथे घडली.

सोन्या सुहास कस्पटे, अभिषेक पवार, आशुतोष वाघिरे, तेजस खेंग्रे आणि त्यांच्या सोबत असलेले तीन ते चारजण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुरुराज म्हातोबा पवार (वय 19, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ साईराज हा त्याचे मित्र निकेश क्षीरसागर आणि रोहन खलसे यांच्या सोबत छत्रपती चौक, कस्पटे वस्ती येथे पाणीपुरी खाण्यासाठी गेला. पाणीपुरी खाताना त्याचा धक्का चुकून एका मुलाला लागला. त्या कारणावरून त्या मुलाने साईराज आणि त्याच्या दोन मित्रांना हाताने व सिमेंटच्या दगडाने मारहाण केली.

त्यानंतर फिर्यादी व त्यांचे चूलत भाऊ साईराज पवार आणि वैभव पवार असे तिघेजण पाणीपुरीच्या दुकानाजवळ गेले. त्यावेळी आरोपींनी काही वेळापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी व त्यांच्या भावांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सोन्या कस्पटे याने पिस्टल सारखी जड वस्तू काढून फिर्यादी यांचा भाऊ ओम यांच्या डोक्यात मागील बाजूस मारले. त्यांनतर फिर्यादी यांना मारले. दोघेजण त्यात जखमी झाले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या भावांना शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर तपास करीत आहेत.