पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

126

गांधीनगर, दि. १२ (पीसीबी) – गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांनी काँग्रस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थित आज (मंगळवार) काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  पटेल यांच्या प्रवेशामुळे  गुजरातमध्ये काँग्रेसला  मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. 

हार्दिक पटेल यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाल्यानंतर जाहीर सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी- वाड्रा यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

काँग्रेस प्रवेशावर हार्दिक पटेल म्हणाले की, मी काँग्रेसची विचारधारा गावोगावात पोहचवणार आहे. महात्मा गांधीजींनी आजच्या दिवशी मीठाचा सत्याग्रह सुरु करुन इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणार, असे सांगितले होते. आज मी याच दिवशी काँग्रेसशी जोडलो गेलो आहे.  सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहलाल नेहरु, सरदार पटेल, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी भारताला सक्षम करण्याचे काम केले आहे, असे  पटेल म्हणाले.