पाटणात जेडीयू आमदाराच्या मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; हत्या कि आत्महत्या अस्पष्ट

315

पाटणा, दि. ३ (पीसीबी) –  संयुक्त जनता दलाच्या आमदार बिमा भारती यांच्या मुलाचा मृतदेह आज (शुक्रवार) रेल्वे ट्रॅकवर सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या कि हत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रपौली भारती असे मृत्यू झालेल्या आमदार बिमा भारती यांच्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालंदा मेडिकल कॉलेज जवळ असलेल्या रेल्वे रुळावर आज एक मृतदेह सापडल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना भेटली होती. यानंतर ती बॉडी आमदार बिमा भारती यांचा मुलगा रपौली भारती याची असल्याचे समोर आले.

दरम्यान, रपौली गुरुवारी रात्री उशीरा आपल्या मित्रांसोबत पार्टी निमित्त घराबाहेर पडला होता. मुसल्लहाट परिसरात ते पार्टी करत होते. मात्र, तो रेल्वे ट्रॅकवर कसा पोहोचला हे स्पष्ट नाही. ही घटना आत्महत्येची आहे, किंवा हत्या हे अद्याप स्पष्ट नाही. पोलिस सध्या या दोन्ही अँगलने तपास करत आहेत. या घटनेमुळे पाटणा शहर हादरले आहे.