पाच हजार वर्षांच्या इतिहासात एकाही हिंदू राजाने मस्जिद तोडली नाही – नितीन गडकरी

175

नागपूर,दि.२८(पीसीबी) – इतिहासात एकाही हिंदू राजाने मस्जिद तोडली नाही, असं केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. आखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

पाच हजार वर्षांच्या इतिहासात असं कधीही झालं नाही की एका हिंदू राजाने मस्जिद तोडली असेल, तसेच कोणत्याही हिंदू राजाने तलवारीच्या जोरावर धर्मांतर घडवून आणलेलं नाही, असंही नितीन गडकरी म्हणाले आहेत. हिंदू संस्कृती- भारतीय संस्कृती ही प्रगतिशील संस्कृती आहे. तसेच सर्वसमावेश आणि सहिष्णू आहे. आम्ही नेहमीच इतर धर्मांचा आदर केला आहे, असंही गडकरी म्हणाले आहेत. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ सर्वधर्म समभाव आहे. हिंदू संस्कृतीचे हे नैसर्गिक रुप आहे. आम्ही प्रत्येक संस्कृतीचा नेहमी आदर करत आलो आहोत. विविधतेत एकता हीच आपची विशेषता असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, हिंदू संस्कृती ना संकुचित आहे ना जातीयवादी आहे. सावरकरांना आपण विसरुन चालणार नाही, त्यांना आपण विसरलो तर १३४७ सारखी परिस्थिती पुन्हा पाहायला मिळू शकते, असं गडकरी म्हणाले आहेत.