पाच वर्षांपासून फरार आरोपीला अटक

1

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पाच वर्षांपासून फरार असलेल्या पोलीस रेकॉर्डवरील आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने पिंपरी येथी जय हिंद शाळेजवळ सापळा रचून अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 1) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

विनोद बळवंत जाधव (वय 26, रा. मिलिंद नगर झोपडपट्टी, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस शहरातील टॉप 25 फरार आरोपींच्या शोधात शहरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार गणेश हजारे व पोलीस नाईक आशिष बोटके यांना माहिती मिळाली की, वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका मारहाणीच्या गुन्ह्यातील एक आरोपी जयहिंद शाळेजवळ, डीलक्स चौक, पिंपरी येथे थांबला आहे.

त्यानुसार पोलिसांनी डीलक्स चौकात सापळा रचून त्याला विनोद जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे सांगितले. आरोपी विनोद मागील पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. विनोद पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा आणि खडकी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल आहे. त्याला पुढील कारवाईसाठी वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

WhatsAppShare