पाच अल्पवयीन मुलांनी केला आठ वर्षीय चिमुरडीवर सामूहिक बलात्कार

112

डेहराडून, दि. १७ (पीसीबी) – उत्तराखंडमधील डेहराडून येथे पाच अल्पवयीन मुलांनी आठ वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार (दि.१३) डेहराडून येथील साहसपूर येथे घडली.

पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत आठ वर्षीय चिमुकली शुक्रवारी साहसपूर येथील तिच्या घराबाहेर खेळत होती. यादरम्यान परिसरातील एका मुलाने तिला खेळण्याच्या बहाण्याने मित्राच्या घरी नेले. तिथे पाच मुलांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांच्या तपासात आरोपी मुलांनी घटनेच्या दोन दिवस आधी पॉर्न फिल्म बगीतली होती. ते बघूनच या मुलांनी बलात्कार करण्याचे ठरवले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपींविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.