पाकिस्थान क्रिकेट संघाला कोरोना

56

प्रतिनिधी दि. २३ (पीसीबी) : पाक क्रिकेट संघाला एक भला मोठा धक्का बसला आहे. इंग्लड दौऱ्यावर रवाना होण्याआधीच पाक क्रिकेट बोर्डाने सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी घेतली. त्यात शादाब खान, हैदर अली आणि हारीस रौफ असे तीन खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले होते, त्यानंतर मंगळवारी आणखी सात खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे मोहम्मद हाफीज आणि वहाब रियाज या दोन ज्येष्ठ खेळाडूंचाही यात समावेश आहे.

पाकिस्तानी संघ २८ जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार होता. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या वैद्यकीय पथकाने सर्व खेळाडुंची कोरोना चाचणी घेतली. त्यातून अनेक खेळाडुंना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंना क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण १० खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याआधी शादाब खान, हैदर अली आणि हारीस रौफ यांना कोरोनी लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर फखर झमान, इमरान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वहाब रियाज या सात जणांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली. पाकिस्तानचे १० खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता त्यांच्या इंग्लंड दौऱ्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानी संघ ३ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. या दौऱ्यावर रवाना होण्याआधी स्वतःची कोरोना चाचणी करून घेणं बंधनकारक करण्यात आलं होतं.

WhatsAppShare