पाकिस्तानी अभिनेत्रीला पतीने घातल्या गोळ्या

282

पाकिस्तान, दि. ९ (पीसीबी) – पाकिस्तानातील प्रसिध्द अभिनेत्री आणि गायिका रेश्माची तिच्या पतीनेच गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्माच्या घरात तिचा नवरा आला त्या दोघांणमध्ये भांडण सुरू झाले. ज्यानंतर त्याने पत्नीवर म्हणजेच अभिनेत्री रेश्मावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर तिथून तो पळून गेला. पोलिसांनी याप्रकरणी रेश्माच्या पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गाणी आणि अभिनय या साठी रेश्मा ओळखली जात होती. झोबल गोलुना या नाटकातली तिची भूमिका चांगलीच गाजली होती.