पाकिस्तानात तब्बल १०० प्रवाशांसह विमान कोसळले

75

कराची, दि. २२ (पीसीबी) : पाकिस्तानात तब्बल 100 प्रवाशांसह विमान कोसळून भीषण दुर्घटना घडली. धक्कादायक म्हणजे हे विमान रहिवासी भागात एका इमारतीवर कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. हे विमान लाहोरवरुन कराचीला जात होतं. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचं हे विमान होतं. पाकिस्तानी मीडियानुसार, ही दुर्घटना कराची विमानतळाजवळ घडली. ज्यावेळी विमान उतरण्याच्या तयारीत होतं, त्यावेळीच ही दुर्घटना घडली. या विमानात 97 प्रवासी आणि 3 क्रू मेंबर्स होते असं सांगण्यात येत आहे.

स्थानिक प्रशासनासह मदत आणि बचावकार्यासाठी आर्मी क्विक रिएक्शन फोर्स आणि सिंध पाकिस्तान रेंजर्स घटनास्थळी पोहोचले. विमान अपघातामुळे आरोग्य मंत्र्यांनी कराचीच्या सर्व मोठ्या रुग्णालयात आपत्कालीन आणीबाणी जाहीर केली आहे

WhatsAppShare