पाकिस्तानात गर्भवती गायिकेची गोळ्या झाडून हत्या

34

उभे राहून गाणे गाण्यास नकार दिल्याने एका सहा महिन्यांच्या गर्भवती गायिकेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाकिस्तानातील सिंध तालुक्यात कांगा गावात एका कार्यक्रमात ही घटना घडली.

समिना सिंधू उर्फ समिना समून (वय २४) असे या गायिकेचे नांव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तारीक अहमद जातोई नावाच्या तरूणाने समिनाला उभे राहून गाणे सादर करण्याची मागणी केली. मात्र, गर्भवती असल्याने समिनाने त्याची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर काही जणांनी समिनावर पैसे उधळले आणि ती उभी राहून गाणे सादर करु लागली. या रागातून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तारीकने समिनावर गोळी झाडली.

समिनाला  रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घडलेला प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. पत्नी गर्भवती असल्याने समिनाच्या पतीने या प्रकरणी आरोपीवर दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.