पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्ब स्फोटात ८ ठार

15

नवी दिल्ली,दि.२७(पीसीबी) : पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्ब स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाल्याची माहिती आहे. पेशावर मधील दीर कॉलनीमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढणार असल्याशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्फोटातील जखमींना लेटी रीडिंग रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात 50 जखमींना दाखल करण्यात आले आहेत. जखमींवर तातडीने उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्याात आली असल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं आहे. पेशावरमध्ये झालेल्या स्फोटामध्ये 19 मुले जखमी झाल्याची माहिती असून जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी मुलांना लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

WhatsAppShare