पाकिस्तानविरोधात हिटमॅनने झळकावले शतक

310

मँचेस्टर, दि. १६ (पीसीबी) – मँचेस्टर मैदानावर आज  भारत विरुद्ध पाकिस्तानात महामुकाबला रंगला  आहे. पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर रोहित शर्माने विराटच्या साथीने संघाचा डाव सावरत झंझावती शतक झळकावले. या स्पर्धेतील रोहित शर्माचे हे दुसरे शतक ठरले आहे.

शिखर धवनच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा लोकेश राहुलच्या साथीने मैदानात उतरला. या दोघांनी भारताला आक्रमक सुरूवात करून दिली. केएल राहुल ५७ धावा करून माघारी परतला, त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मा साथ देत भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू टेवली आहे.

दरम्यान,  जायबंदी शिखर धवनच्या जागी विजय शंकरला संघात जागा देण्यात आली आहे.

 

WhatsAppShare