पाकिस्तानमध्ये न्यूज अँकरची गोळ्या झाडून हत्या

136

कराची, दि. १० (पीसीबी) – एका खासगी न्यूज चॅनलच्या अँकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.९) खैबन-ए-बुखारी परिसरात घडली.

मुरीद अब्बास असे मृत अँकरचे नाव असून तो कराची येथे ‘बोल न्यूज चॅनल’साठी काम करत होता. तर आतिफ झमा असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी खैबन-ए-बुखारी परिसरात आतिफ आणि मुरीदचा एका गोष्टीवरून वाद झाला होता. त्याच वादातून आतिफने मुरीदच्या पोटात एक आणि छातीत दोन गोळ्या झाडल्या. घटनास्थळी अँकर मुरीदचा आणखी एक मित्र खिज्र सुद्धा उपस्थित होता. आरोपीने त्याला देखील ठार मारले. त्यांच्या मित्रांनीच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. आतिफला अटक करण्यासाठी पोलिस त्याच्या घरी पोहोचले असता त्याने स्वतःवर गोळी झाडली. त्याच्या छातीत गोळी लागली असून तो सध्या गंभीर आहे. पीडित अँकर मुरीदची पत्नी झारा अब्बास सुद्धा एका खासगी न्यूज चॅनलमध्ये अँकर आहे.