पाकिस्तानच्या संघाचे कौतुक केल्याने मोहम्मद कैफ ट्विटरवर ट्रोल

34

मुंबई, दि. १० (पीसीबी) – तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्याबद्दल पाकिस्तानच्या संघाचे कौतुक केल्याने भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफला ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

मोहम्मद कैफने एक ट्विट करत दमदार कामगिरी केल्याने पाकिस्तानच्या संघाचे आणि फलंदाज फखर इमानचे कौतुक केले. पण पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानी संघाचे कैफने कौतुक केल्यामुळे काही चाहते संतापले. त्याकारणास्तव आता ट्विटरवर मोहम्मद कैफला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

‘टी-ट्वेण्टी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्याबद्दल पाकिस्तानचे अभिनंदन. फखर इमानची खेळी उत्तम होती. तो मोठ्या सामन्यांतील हुकमी खेळाडू आहे,’ असे कैफने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.