पाकिस्तानच्या लष्कराला बूट पॉलिश करणाऱ्याची गरज; इम्रान खानवर रेहम खानची टीका

364

इस्लामाबाद, दि. २९ (पीसीबी) – पाकिस्तानच्या लष्कराच्या मदतीने इम्रान खान यांनी पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला आहे. पाकिस्तानच्या लष्कराला बूट पॉलिश करणाऱ्याची गरजच होती. आणि त्यासाठी इम्रान खान यांच्यापेक्षा दुसरा योग्य व्यक्ती नाही. पण मला वाटतं इम्रान यांच्यावर लष्कराची ही कृपा थोड्याच दिवसांसाठी असेल, असे सूचक विधान इम्रान खान यांच्या पूर्वाश्रमीची पत्नी रेहम खान यांनी केले आहे.

रेहम खानने आपल्या पुस्तकातून इम्रान खान यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पण आता इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी बसणार आहेत, त्या पाऱ्श्वभूमीवर बोलताना त्यांनी पाकिस्तानच्या लष्कराला बूट पॉलिश करणाऱ्याची गरजच होती, असे अत्यंत बोचऱ्या शब्दांत त्यांनी इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रेहम म्हणाल्या की, इम्रान केवळ एक्टर आहे, तर तेथील लष्कर डायरेक्टर आहे. हा जनाधार दिसत असला तरी हे सर्व आधीच ठरले होते. इम्रान खान यांची पाच अनौरस मुले असून यातील काही भारतातील आहेत. इम्रान खानचे १९७० च्या दशकात बॉलिवूडमधील एका सुपरस्टार अभिनेत्रीशी देखील संबंध होते. रेहम खान यांनी इम्रान खान यांचे अनैतिक संबंध आणि खासगी आयुष्यातील अन्य काही गोष्टी त्यांच्या पुस्तकातून उघड केल्या आहेत.