पाऊण लाखांची रोकड असलेली बॅग कारमधून लांबवली

1

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – कारमध्ये ठेवलेल्या एका बॅगेत 76 हजार 400 रुपयांची रोकड होती. अज्ञात चोरट्याने ही रोकड असलेली बॅग चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 1) रात्री अकराच्या सुमारास कस्पटेवस्ती, वाकड येथे घडली.

अभिनित नरेंद्र शहा (वय 47, रा. कॅस्केट सोसा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शहा यांनी त्यांच्या कारमध्ये एक बॅग ठेवली होती. त्या बागेत 76 हजार 400 रुपयांची रोकड आणि बँकेचे पासबुक होते. शहा यांनी नजर चुकवून अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग कारमधून चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare