पहिली पत्नी हयात असताना केले दुसरे लग्न; दुस-या पत्नीला देखील फसवणूक करून केली मारहाण..

110

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पहिली पत्नी जिवंत असताना एकाने दुसरे लग्न केले. दुस-या पत्नीला पहिल्या लग्नाबाबत काहीही सांगितले नाही. तसेच दुस-या पत्नीकडून पैसे घेऊन तिची फसवणूक केली. तिच्यावर बलात्कार केला. तिला शिवीगाळ करून घरातून निघून गेला. याप्रकरणी दुस-या पत्नीने पोलिसात फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर २०२० ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत संत तुकारामनगर पोलीस चौकीच्या पाठीमागे घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने मंगळवारी (दि. ७) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३३ वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःचे पहिले लग्न झालेले असताना ते लपवून ठेऊन पहिली पत्नी हयात असताना फिर्यादी महिलेसोबत दुसरे लग्न केले. आरोपीने त्याचे जम्बो कोविड सेंटर नेहरूनगर येथील काम सोडल्याचे सांगून गुगल अकाउंट बंद पडल्याचे सांगून रूमचे डिपॉझिटचे १५ हजार आणि ४८०० रुपये लॅपटॉपचा हप्ता फिर्यादीस देण्यास सांगितले.

आरोपीला पगाराबाबत विचारणा केली असता त्याने फिर्यादीस मारहाण केली. कार घेण्यासाठी फिर्यादीकडे पैसे मागितले. त्यासाठी फिर्यादीने नकार दिला. आरोपीने फिर्यादीस मारहाण करून अनैसर्गिक संभोग केला. आरोपी हा फिर्यादीची फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी त्याबाबत विचारणा केली असता ‘मी तुझ्या सोबत लग्न करून चूक केली असे म्हणून शिवीगाळ करत ७ सप्टेंबर रोजी फिर्यादीला काहीही न सांगता घर सोडून निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.