पहाटेच्या वेळी सायकलवरून जाणा-या महिलेचा विनयभंग

242

मोशी, दि. ११ (पीसीबी) – पहाटेच्या वेळी सायकलवरून जात असलेल्या महिलेसोबत एका दुचाकीस्वाराने गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. ही घटना मंगळवारी (दि. 10) पहाटे साडेपाच वाजता क्रांती चौक ते सरदार चौक दरम्यान मोशी येथे घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता सायकलवरून क्रांती चौक ते सरदार चौक मोशी येथून जात होत्या. त्यावेळी एका दुचाकीवरून एक अनोळखी व्यक्ती आला. त्याने फिर्यादींसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला आणि निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.