पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याची हत्या; तृणमुल काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना अटक

51

परगना, दि. २९ (पीसीबी) – पश्चिम बंगालच्या दक्षिण २४-परगना जिल्ह्यातील भाजपा नेत्याच्या हत्येप्रकरणी तृणमुल काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवार (दि.२७) रात्रीच्या सुमारास ही हत्या करण्यात आली होती.

शक्तिपदा सरदार (वय ४५)  असे हत्या झालेल्या भाजप नेत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने वार करुन २४-परगना जिल्ह्यातील भाजप नेता शक्तिपदा यांची हत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर भाजपा नेत्यांनी या हत्येमागे तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणी पोलिसांनी  तृणमुल काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २४-परगना पोलिस अधिक तपास करत आहेत.