पर्वती येथे दोन जणांच्या खूनातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

367

पुणे, दि. २९ (पीसीबी) – दोन जणांच्या खूनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी  दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि चार जीवंत काडतुसे असा १ लाख २०० रुपयांच्या ऐवजासह अटक केली आहे.

सुनील उर्फ चॉकलेट सुन्या (वय ३३, रा. पर्वती ) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक सराईत गुन्हेगार पर्वती पायथा येथे पिस्तुल घेऊन उभा असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळाली होती. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून सुनील याला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन देशी बनावटीची पिस्तुले व चार काडतुसे असा तब्बल १ लाख २०० रुपयांचा ऐवज अडळून आला. पोलिसांनी तो जप्त केली असून सुनील याला अटक केली. त्याची सखोल चौकशी केली असता तो सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर दोन खून, सहा खूनाचे प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी यासारखे तब्बल २५ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस अधिक तपास करत आहेत.