परिमंडळ तीनच्या पोलीस उपआयुक्त पदी मंगेश शिंदे यांची नियुक्ती

158

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनचे पोलीस उप आयुक्त म्हणून मंगेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. मावळते पोलीस उप आयुक्त गणेश शिंदे यांनी मंगेश शिंदे यांच्याकडे पोलीस उप आयुक्त पदाची सूत्रे सोपविली.

परिमंडळ तीनचे पोलीस उप आयुक्त गणेश शिंदे यांची मुंबई शहर पोलीस उप आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पुणे शहर परिमंडळ तीनच्या पोलीस उप आयुक्त पदावर मंगेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.