परतीच्या पावसाची दुष्काळग्रस्त लातूर आणि धुळ्यात हजेरे; ३९ पावसाची नोंद

124

धुळे, दि. ५ (पीसीबी) – लातूर जिल्ह्यात आज सकाळ पर्यंत एकूण सुमारे ३९ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची पावसाची सरासरी सुमारे चार टक्के असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक समारे नऊ मिली मीटर पाऊस निलंगा तालुक्यात झाला असून, देवणी तालुक्यात सर्वात कमी सुमारे अर्धा मिली मीटर पाऊस झाला आहे. तर शिरुर अनंतपाळ तालुक्यात अद्याप पावसाची नोंद झालेली नाही.

धुळे जिल्ह्यातले बहुतांश लघु आणि मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. अशा परिस्थितीतीत पावसामुळे नदींना पूर येऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगत सतर्क रहावे, असे आवाहन धुळ्याचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी केले आहे. वेध शाळेने मध्यम स्वरुपाचा पाऊस किंवा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दल सतर्क असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

धुळे जिल्ह्यातील पांझरा, मालनगाव, जामखेडी, बुराई, करवंद, वाडीशेवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहेत, तर अमरावती प्रकल्पात नव्वद टक्के जलसाठा झाला आहे. अक्कलपाडा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून नकाणे तलाव भरण्यात येत आहे, तर डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.