पदमिनी महादेव कसबे यांचे अल्पशा आजाराने निधन

77

पुणे, दि.१८ (पीसीबी) – रामटेकडीमधील वंदेमातरम चौकात राहणाऱ्या पदमिनी महादेव कसबे  वयाच्या ६४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले  आहे. त्यांच्यावर रामटेकडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्यामागे एक मुलगा, तीन मुली , सून , नातवंडे व जावई असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष रामभाऊ कसबे यांच्या त्या मातोश्री होत्या.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार चेतन तुपे,  माजी आमदार जयदेवराव गायकवाड, माजी आमदार महादेव बाबर,  नगरसेवक प्रशांत जगताप,  नगरसेवक आनंदा आळकुंटे, नगरसेवक धनराज घोगरे,  नगरसेविका कालिंदा पुंडे, प्रविण तुपे, दिलीप जांभुळकर, महेश पुंडे व अनिल हातागळे व हडपसर, रामटेकडी व वानवडीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .