पत्रकार संदेश पुजारी यांना पितृशोक; धोंडीराम पुजारी यांचे निधन

140

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील पत्रकार संदेश पुजारी यांचे वडील धोंडीराम श्रीकांत पुजारी (वय ६३) यांचे सोमवारी (दि. १०) पहाटे सातारा येथे निधन झाले.

धोंडीराम पुजारी हे सातारा रिमांड होम येथून अधीक्षक पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सातारा येथील माहुली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.