पत्नी आणि मुलगा यांना धमकी दिल्याप्रकरणी भाजप नगरसेवका विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

114

पिंपरी, दि.२२ (पीसीबी) – निवडणुकीच्यावेळी राहते घर तुझ्या नावावर केले होते. आता ते माझ्या नावावर करून दे, नाहीतर तुम्हाला भीक मागायला लावेल. तुम्हाला दिघी गावात राहू देणार नाही, पत्निला धमकी दिल्याप्रकरणी भाजप नगरसेवकावर दिघी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण उंडे असे या आरोपी भाजप नगरसेवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “व्हॅलेन्टाइन डे’च्या दिवशी अर्थात १४ फेब्रुवारी रोजी नगरसेवक लक्ष्मण उंडे यांनी पत्नी यमुना उंडे आणि मुलगा दीपक यांना धमकी दिली.निवडणुकीच्यावेळी राहते घर तुझ्या नावावर केले होते. आता ते माझ्या नावावर करून दे, नाहीतर तुम्हाला भीक मागायला लावेल. तुम्हाला दिघी गावात राहू देणार नाही, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी भाजप नगरसेवक विरोधात त्यांच्या पत्नीने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत यमुना उंडे (वय ४४, रा. साई पार्क, दिघी) यांनी गुरुवारी (दि. २१) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

WhatsAppShare