पत्नीशी भांडण झाल्याच्या रागातून पतीने फेसबुक लाइव्ह करुन केली आत्महत्या

567

गुरुग्राम, दि. ३१ (पीसीबी) – पत्नीशी भांडण झाल्याच्या रागातून पतीने फेसबुक लाइव्ह करत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास गुरुग्राममधील पतौडी गावात घडली.

अमित चौहान (वय २८, रा. पतौडी, गुरुग्राम) असे आत्महत्या केलेल्या विवाहीत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सोमवारी संध्याकाळच्या सुमारास अमित चौहान या तरुणाने फेसबुक लाइव्ह करत गळफास घेतला. पत्नीशी भांडण झाल्याच्या रागातच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे कुटुंबियांनी घटनेसंबंधी पोलिसांना कळवले नाही. पोलिसांशी संपर्क न साधताच त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. यामुळे पोलिसांचा संशय बळावला असून त्यांनी त्यादृष्टीने तपास सुरु केला आहे.