पत्नीला मारहाण करणा-या तळीराम पतीवर गुन्हा दाखल

12

भोसरी,दि.१९(पीसीबी) – दारू पिऊन घरी आलेल्या पतीने पत्नीला स्टीलच्या रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये पत्नी जखमी झाली. याबाबत पत्नीने पोलिसात धाव घेत पती विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 15) सायंकाळी सहा वाजता मिनी मार्केटजवळ, इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.

नितीन बाबुराव कांबळे (वय 45, रा. मिनी मार्केट जवळ, इंद्रायणीनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत अपर्णा नितीन कांबळे (वय 36) यांनी रविवारी (दि. 18) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी आरोपी पती नितीन दारू पिऊन घरी आला. त्याने घराच्या दरवाजावर लाथा मारून पत्नी अपर्णा यांना शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण केली. नितीन याने अपर्णा यांना स्टीलच्या रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये अपर्णा यांच्या हातावर, कमरेवर, पायावर गंभीर दुखापत झाली आहे. एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare