पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल

1

काळेवाडी, दि. 13 (पीसीबी) : पतीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याने पत्नीचा छळ केला. माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. या त्रासाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार काळेवाडी परिसरात घडला.

सागर शिवाजी इटकर (वय 23, रा. नढेनगर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. 21 वर्षीय पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत मयत महिलेच्या 42 वर्षीय आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर हा फिर्यादी यांचा जावई आहे. त्याचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध होते. त्यासाठी फिर्यादी यांची मयत मुलगी सागरला विरोध करत होती. यावरुन सागरने पत्नीचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला.

सागर याने पत्नीला मारहाण केली. तसेच व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. सागरच्या सततच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने मंगळवारी पहाटे दोन वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare