पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या जावयाला मिरची पूड टाकून मारहाण

53

मोशी, दि. १३ (पीसीबी) – पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या जावयाला सासरा आणि मेहुण्याने मिरची पूड डोळ्यात टाकून मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 11) सकाळी वाघेश्वर कॉलनी नंबर चार, मोशी येथे घडली.

सुनील गणेश पोटे (वय 35, रा. राळेगणसिद्धी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे जखमी जावयाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जालिंदर वाघमारे (वय 53), अजय जालिंदर वाघमारे (वय 21, दोघे रा. वाघेश्वर कॉलनी, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील पोटे यांच्या पत्नी ज्योती माहेरी गेल्या होत्या. पत्नी ज्योती यांना आणण्यासाठी फिर्यादी सोमवारी सकाळी सासरी मोशी येथे आले. त्यावेळी सासरे जालिंदर यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून ‘तू परत कशाला आला’ असे म्हणत मारहाण केली. त्यानंतर मेहुणा अजय याने घरातून मिरची पावडर आणून फिर्यादी यांच्या डोळ्यात टाकली. त्यानंतर घरासमोर पडलेला दगड डोळ्याच्या भुवईवर, नाकावर मारून दुखापत केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare