पत्नीच्या मोबाईलमधून अ‍ॅपद्वारे घेतली गोपनीय माहिती आणि परस्पर…

27

पुणे, दि.१५ (पीसीबी) : पतीने आपल्या पत्नीची माहिती मिळविण्यासाठी चक्क पत्नीच्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर डाऊनलोड त्याद्वारे तिची माहिती मिळविल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या काही वर्षांपासून पती तिची माहिती मिळवत होता.याप्रकरणी कोथरुड पोलिसांत विनयभंग यासह माहिती आयटी ऍक्टनुसार ३७ वर्षीय पतीवर गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात शिवतीर्थनगर येथील ३४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी हे दोघे पती-पत्नी आहेत. फिर्यादीकडे पती सतत पैसे मागत. त्यावरुन त्यांच्यात वाद होत होते. फिर्यादीच्या चारित्र्यावर पती संशय घेत असत. त्याने मारहाणीत शिवीगाळ व मारहाण करीत आहे. पतीने २०१३ मध्ये एक मोबाईल भेट दिला होता. मोबाईलमध्ये त्याने “स्पाय अ‍ॅप अँड रेकॉर्डर” नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करुन ठेवले होते. या अ‍ॅपद्वारे त्यांची सर्व गोपनीय माहिती परस्पर आरोपी पतीने त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक लॅपटॉप व मोबाईलमध्ये घेऊन त्याचा गैरवापर केला. कोथरुड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बडे अधिक तपास करीत आहेत.

WhatsAppShare