पत्नीच्या निधनानंतर तरुणाने केला तृतीय पंथीयासोबत विवाह

1594

नांदेड, दि. ३ (पीसीबी) –  पत्नीच्या निधनानंतर तरुणाने तृतीय पंथीयासोबत विवाह केला. ही घटना किनवट तालुक्यातील बोधडी या गावात घडली.राजू हनवते असे या तरुणाचे नाव असून हसीना असे तृतीय पंथीयाचे नाव आहे.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे राहणाऱ्या राजू याच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तो आपल्या दोन मुलांसोबत राहत होता. मजुरी करणाऱ्या या तरुणाची रेल्वेत हसीना या तृतीय पंथीयासोबत ओळख झाली. नेहमी होणाऱ्या भेटीमुळे दोघात मैत्री झाली आणि राजुने हसीनासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्या प्रस्तावाला हसीनाने होकार दिला. त्यानंतर बोधडी येथील सरपंच मारोती शिंगारे यांनी पुढाकार घेत हे लग्न लाऊन दिले.

दरम्यान, आपल्या मुलांचा सांभाळ व्हावा, यासाठी राजू याने सगळ्या परंपरा झुगारत हे लग्न केल्याचे म्हटले आहे. या अनोख्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा होत असून दोघांचेही कौतुक होत आहे.