पत्नीच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा महाभाग

72

नेल्लोर, दि. २३ (पीसीबी) – आंध्र प्रदेशच्या नेल्लोरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आपल्या पत्नीला शिवीगाळ आणि तिच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीने हा व्हिडीओ आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना पाठवला होता. ही घटना नेल्लोर जिल्ह्यातील आत्मकूर शहरात घडली. १२ वर्षांपूर्वी कोंडम्मा (२९ वर्षीय) या मृत महिलेचं लग्न पेंकलैया याच्याशी झालं होतं. या जोडप्याला दोन मुलं झाली होती.

आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पेंकलैया काही काळापासून आपली पत्नी कोंडम्माला त्रास देत होता. मंगळवारी (२१ सप्टेंबर) रात्री दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर, कोंडम्मा यांनी आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या पती आणि मुलांसमोरच पंख्याला साडी बांधून गळफास लावला. धक्कादायम म्हणजे यावेळी आपल्या पत्नीला थांबवण्याऐवजी पेंकलैया कोंडम्माचा आत्महत्येचा व्हिडीओ काढला. तो इतक्यावरच थांबला नाही तर आपल्या पत्नीच्या नातेवाईकांसह त्याने हा व्हिडिओ शेअर केला.


व्हिडीओ शेअर करत पेंकलैया तिच्या नातेवाईकांना सांगितलं की. अंतिम संस्कार करण्यासाठी कोंडम्माचा मृतदेह घेऊन जा. कोंडम्माच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, आत्मकूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि पेंकलैयाला अटक केली आहे. आंध्र प्रदेशमधील या हादरवून टाकणाऱ्या धक्कादायक प्रकाराबाबत मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार आत्मकूर उपनिरीक्षक शिवशंकर म्हणाले की. “पती तिला (कोंडम्मा) त्रास देत असे. त्यानंतर तिने हे टोकाचं पाऊल उचललं. आम्ही तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हा गुन्हा दाखल केला आहे. आम्ही यात सहभागी असलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करू”

WhatsAppShare