पत्नीचा गर्भपात केल्याने रहाटणीतील पतीविरोधात गुन्हा

399

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार पत्नीचा छळ करुन तिचा गर्भपात केल्याने पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २८ नोव्हेंबर २०१७ ते आजपर्यंत रहाटणीतील, संत तुकडोजी कॉलणी मध्ये झाला.

याप्रकरणी पिडीत २८ वर्षीय विवाहितेने पती संदिप अरुन पवार (रा. नखातेनगर, संत तुकडोजी कॉलणी, रहाटणी) याच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरुण पवार याने पिडीत २८ वर्षी फिर्यादी महिलेसोबत फसवून लग्न केले होते. तो तिला वारंवार माहेरहून पैसे आणण्यास जबरदस्ती करुन मारहाण करत होता. तसेच पैसे न आणल्याने तिचा मानसिक आणि शारीरीक छळ करायचा. आरोपी पवार याने पत्नीचा गर्भपात देखील केला होता.पोलिसांनी संदिपवर गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.