पती-पत्नीच्या किरकोळ भांडणावरून जावयाला मिरची पूड टाकून मारहाण

123

पिंपळे गुरव, दि. २० (पीसीबी) – जावयाचे आणि मुलीचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यावरून सासरा, सासू, साडू, मेहुणा यांनी जावयाच्या आणि त्याच्या आईच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण केली. ही घटना 8 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता भालेकरनगर, पिंपळे गुरव येथे घडली.

दत्तात्रय महादेव कुटे (वय 37, रा. भालेकरनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 19) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रावसाहेब गुंडा गळवे, बालाजी रावसाहेब गळवे, चंदाबाई रावसाहेब गळवे (तिघे रा. भोसरी), रेवणसिद्ध करांडे (रा. शिरवळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय आणि त्यांच्या पत्नीचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्या कारणावरून फिर्यादी यांचे सासरे रावसाहेब, मेहुणा बालाजी, सासू चंदाबाई आणि साडू रेवणसिद्ध या चौघांनी फिर्यादी आणि त्यांच्या आईच्या डोळ्यात मिरची पूड टाकली.

फिर्यादी यांना हाताने, लाथाबुक्क्याने मारहाण केली. चंदाबाई हिने चामडी चप्पलने फिर्यादी यांच्या डोक्यात, पाठीवर, पायावर मारहाण केली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले आहेत. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.