पतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ

102

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – पतीच्या निधनानंतर मिळालेले डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 19 मार्च ते 28 जून 2021 या कालावधीत घडली.

याप्रकरणी 33 वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. 20) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेच्या पतीचे निधन झाले आहे. त्यानंतर पतीच्या डेथ क्लेमचे 38 लाख 49 हजार रुपये विमा कंपनीने विवाहितेच्या जमा केले. त्यातील 50 टक्के रक्कम आरोपींनी देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास निघून जाण्यास सांगत त्यांच्याशी भांडण केले. त्यानंतर आरोपींनी विवाहितेला मारहाण करून घराबाहेर काढले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare