पतीच्या छळाला कंटाळून विवाहीत महिलेची इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या

135

हडपसर, दि. ९ (पीसीबी) – पतीच्या छळाला कंटाळून एका विवाहीत महिलेने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (दि.७) हडपसर येथील मगरपट्टा सिटी येथे असलेल्या कॉसमॉस अपार्टमेंटच्या ११ व्या मजल्यावरुन महिलेने उडी घेतली.

मिनाक्षी गिरीश पांडे (वय ४६, रा. कॉसमॉस अपार्टमेंट, ११ वा मजला, एफ विंग, मगरपट्टा सिटी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या विवाहीतेचे नाव आहे. याप्रकरणी मिनाक्षीची बहिण मृत्युंजय पाठक (वय ५६, रा. मंडल, मध्यप्रदेश ) यांनी मिनाक्षीचे पती गिरीश सुरजप्रसाद पांडे (वय ४७) यांच्या विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनाक्षी आणि गिरीश यांचे मे २०१८ मध्येच लग्न झाले होते.  लग्नानंतर सासरी नांदत असताना पती गिरीश याने मिनाक्षी यांचा शारिरीक व मानसिक छळ केला. या छळाला कुंटाळून मिनाक्षी यांनी हडपसर येथील  मगरपट्टा सिटी येथे असलेल्या कॉसमॉस अपार्टमेंटच्या ११ व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. हडपसर पोलिस तपास करत आहेत.