पण जर त्यांनी पुरवठा केला नसता, तरी काही हरकत नव्हती. पण मग आम्हीही जशास तसे उत्तर दिले असते – ट्रम्प

178

 

दिल्ली, दि.७ (पीसीबी) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताकडे मदत मागितली असून यावेळी त्यांनी धमकीवजा इशाराही दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

भारताने मदत नाही नसती तर काही हरकत नव्हती, पण मग त्यांनी आमच्याकडूनही तशी अपेक्षा ठेवण्याची गरज नव्हती असे म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, “मी रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. तुम्ही आम्हाला हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करत आहात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत असे सांगितले आहे. पण जर त्यांनी पुरवठा केला नसता, तरी काही हरकत नव्हती. पण मग आम्हीही जशास तसे उत्तर दिले असते, आणि ते आम्ही का करु नये ?”.

WhatsAppShare